---Advertisement---
बातम्या

ग्राहकांना मोठा दिलासा! सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी घसरली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२४ । मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. यामुळे खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गेल्या सात दिवसांत सोने आणि चांदीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate 11 January 2024

gold 1 jpg webp

डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूंनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर ही पडझड ग्राहकांसाठी फायदेशीर ठरली आहे. नवीन वर्षातील दुसऱ्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारीपासून सोने-चांदीत पडझड सुरु आहे. मंगळवारी चांदीने किंचित उसळी घेतली होती. गेल्या सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी घसरली. हा ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही धातूंच्या किंमती जास्त आहेत.

---Advertisement---

काय आहे सोने चांदीचा दर
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.दुसरीकडे 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

दरम्यान, MCX वर आज सकाळी बाजाराच्या सुरुवातीपासून सोने चांदीचे दर हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत सोन्याचा दर 149 रुपयांनी वाढून 62,145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 159 रुपयांनी वाढून 72,128 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---