वाणिज्य

सोने 2000 रुपयांनी घसरले ; आता खरेदी करणे फायदेशीर ठरेल का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. कोरोना लॉकडाऊन दरम्यान सोन्याचा किमतीने 56200 रुपयांपर्यंतची विक्रमी उच्चांक गाठली होती. त्यानंतर आता सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. गेल्या काही दिवसापूर्वी सोन्याने तब्बल 58,850 पर्यंतची मजल मारली होती. मात्र आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर घसरण झाली आहे. Gold Silver Rate Today

सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 56,780 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे 58,847 रुपयांच्या विक्रमी उच्चांकापेक्षा जवळपास रुपये 2,000 स्वस्त होते. आंतरराष्ट्रीय बाजारात, पिवळा धातू 1,852 डॉलर प्रति औंस या नीचांकी पातळीवर जाऊन 1,865 डॉलर प्रति औंसवर बंद झाला. चांदीच्या किमतीही आठवडाभर दबावाखाली राहिल्या आणि एक टक्क्याने घसरल्या. अशा परिस्थितीत आता सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल की प्रतीक्षा करणे योग्य ठरेल. चला तर जाणून घेऊया काय आहे तज्ज्ञांचे मत.

सराफा तज्ञ काय म्हणतात?
सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, यूएस डॉलर इंडेक्स आणि यूएस बॉण्ड यिल्ड ओव्हरसोल्ड झोनमधून परत आले आहेत. त्यामुळे सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात यूएस डॉलरचे दर आणि यूएस बॉण्ड यिल्डमध्ये त्यांच्या ओव्हरसोल्ड झोनमधून बाऊंस दिसून आला. मात्र, आगामी काळात पुन्हा एकदा तेजी येऊ शकते.

ही आहे खरेदीची योग्य वेळ

सोन्याचा भाव 56,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिर असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, जर सोन्याची किंमत यापेक्षा कमी झाली आणि 55,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली, तर सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ असेल. येत्या काही दिवसांत सोन्यावर दबाव येऊ शकतो. अशा परिस्थितीत सोन्याचा भाव पुन्हा एकदा 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला तर खरेदी करता येईल. येत्या तीन ते चार महिन्यांत सोन्याचा भाव 57 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर चांदीची किंमत 72 हजार प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.

काल सोने चांदीच्या किमतीत झाली मोठी घसरण?
दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 669 रुपयांनी घसरून 56,780 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव 1,026 रुपयांनी घसरून 66,735 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

जळगावातील दर
जळगाव सवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोने जवळपास 57,300 हजार प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर 67000 रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button