चार दिवसानंतर चांदीत 1000 रुपयांची वाढ, सोनेही महागले.. वाचा आजचे भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । सोने आणि चांदीच्या दरात चढ उताराचा काळ सुरूच आहे. चांदीच्या दरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून घसरण सुरु झाली आहे. चांदी दरात २ हजार रुपयांनी घसरण दिसून आली.मात्र आता चार दिवसानंतर चांदीच्या दरात १००० रुपयाची वाढ झाली. पुढील आठवडाभरा चांदीच्या दरात असेच चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. दुसरीकडे सोने दरात १०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.
परंतु या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६३,४०० रुपयांवर होता तर चांदीचा दर ७२,५०० रुपयावर होता. त्यात या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. सोने प्रति तोळा ३०० रुपयांनी तर चांदी ५०० रुपयांनी घसरण दिसून आली.
जळगावातील सोने चांदीचा भाव ?
जळगावात सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ५७,८०० रुपयांवर तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६३,१०० रुपये प्रति किलोवर आहे. तसेच चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ७२००० हजार रुपयांवर आहे.