Gold-Silver Rate : आजचा सोने-चांदीचा भाव : १ जानेवारी २०२१

जानेवारी 1, 2022 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२१ । या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या (Gold) दरात काहीशी घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या (Gold) दरात देखील किंचित घट झालीय. आज जळगाव सराफ बाजारात सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे. काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने किंचित ५० रुपयाने महागले होते. तर चांदी ३५० रुपयांनी महागली होती.

gold silver

या आठवड्यात सोने चार वेळा स्वस्त झाले तर एक वेळा महागले, गेल्या ५ दिवसात सोने जवळपास २७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदीचे दरात चढ-उतार दिसून आला. गेल्या ५ दिवसात चांदी किंचित १५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जळगाव सराफ बाजारात १ डिसेंबर २०२१ ला सोन्याचा प्रति तोळा ४८,७२० रुपये इतका होता. तो काल अखेरीस ४९,०१० इतका होता.

सध्या भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. महाराष्ट्रात देखील काल दिवसभरात कोरोनाचे ८ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. आगामी काळात वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहे. यावर्षी २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या वर्षभरात (२०२१) सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला दिसून आला. १ जानेवारी २०२१ रोजा १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,३३० इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६९,७०० रुपये इतका होता. म्हणजेच या वर्षाच्या उच्चांक पातळीवरून सोने जवळपास २ हजार रुपयांनी स्वस्त आहे. तर चांदी ३५०० हजार रुपयांनी स्वस्त आहे. या ३१ मे २०२१ रोजी सोन्याचा दर ४५ हजार रुपयांच्या घरात होता. तर दुसरीकडे मात्र चांदी ७४ हजार रुपयांच्या घरात होती. त्यानंतर पुन्हा सोने वाढीस लागले होते. तर चांदीत घसरण झाल्याचे दिसून आले.

आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२७ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये असा होता. २८ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये इतका नोंदविला गेला. २९ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,९८० रुपये इतका नोंदविला गेला. ३० डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२९० रुपये इतका नोंदविला गेला. ३१ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे.

अशी ओळखा सोन्याची शुद्धता
ISO (Indian Standard Organization) कडून सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतांशे सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते. काही जण 18 कॅरेटची खरेदी करतात. मात्र, 24 पेक्षा जास्त कॅरेट नसतात. जितके जास्त कॅरेट सोने तितके शुद्ध असते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now