---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ ; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे नवीन दर

gold silve
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील जून महिन्यात घसरण झालेल्या सोन्याच्या दरात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून वाढ होतानाचे दिसून येतेय. आज गुरुवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

gold silve

त्यामुळे सोन्याच्या भाव पुन्हा ४८ हजाराच्या वर गेला आहे. आज बुधवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत २५० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव २६० रुपयांनी वाढला. मात्र आज चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदी प्रति किलो ८०० रुपयाने स्वस्त झाले आहे.

---Advertisement---

जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, काल बुधवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढला होता. तर आज पुन्हा सोन्याच्या दरात दरात वाढ नोंदविली गेलीय.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.  

 आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८१२ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,१२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५८३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५, ८३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ८०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,१०० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---