ग्राहकांसाठी खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा दर घसरला, आता नवीन दर काय?

फेब्रुवारी 16, 2026 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२६ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय सराफ बाजारात सोन्यासह चांदीचे भाव गगनाला भिडले असून दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्यासह चांदी दरात घसरण झाली आहे.

gold silver jpg webp

आजचे सोन्याचे दर

Advertisements

गुडरिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,३१० रुपयांनी घसरून १,५६,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर १२०० रुपयांनी कमी झाले आहे. हे दर १.४३ लाख रुपये झाले आहे. आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे जवळपास हजार रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१७,३३० रुपये झाले आहे.

Advertisements

चांदीचे दर
आज चांदीचे दर देखील घसरले आहेत. चांदीचे दर ७००० रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचा एक किलोचा दर २,६८,००० रुपये झाले आहेत.चांदी उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे दीड लाख रुपयांहून अधिकने स्वस्त झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now