जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२६ । एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असून याच दरम्यान, सोन्याचे दर पुन्हा नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी दरात वाढ झाली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

जळगाव सराफ बाजारात आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात प्रति तोळा ६१८ रुपयांची वाढ नोंदवली गेली. सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झालीय. आज सकाळी बाजार उघडल्यावर चांदी दरात प्रति किलो २०६० रुपयांची वाढ नोंदवली गेली

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणात्मक बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आशियाई व्यवहाराच्या वेळेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

काय आहे सोन्याचा दर
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळी बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोने दरात ६१८ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ९०३ रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी सोमवारी १४४२ रुपयांची तर मंगळवारी ७२१ रुपयांची वाढ झाली होती. तर आजच्या वाढीनंतर या तीन दिवसात सोने २७८१ रुपयांनी वाढले आहे.
चांदीचा दर ?
दुसरीकडे आज सकाळी चांदी दरात २०६० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८२ हजार २२० रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी सोमवारी ११ हजार ३३० रुपयांची तर मंगळवारी १०३० रुपयांची वाढ झाली होती. तर आजच्या वाढीनंतर तीन दिवसात १४,४२० रुपयांची वाढ झाली आहे.










