---Advertisement---
वाणिज्य सोने - चांदीचा भाव

अनंत चतुर्दशीला सोने-चांदीच्या किमतीत झाली मोठी वाढ ; वाचा आजचे दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । आज अनंत चतुर्दशी. आज लाडक्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा देशभरात पार पडेल. दरम्यान, आज अनंत चतुर्दशीलाच मात्र सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोने पुन्हा वरच्या दिशेने जाऊ लागले आहे. तर दुसरीकडे आजच्या वाढीने चांदीच्या भावाने ५५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. Gold Silver Price Today

gold silver rate 2 jpg webp

MCX वरील आजचा सोने आणि चांदीचा भाव?
MCX वर, सकाळी 10 वाजेनंतर 24-कॅरेट शुद्धतेचे सोने जवळपास 200 रुपयांनी महागले. त्यामुळे सोने 50,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​गेले. यापूर्वी मागील दोन सत्रात सोन्याच्या भावात घसरण झाली होती. तर दुसरीकडे आज सकाळी चांदीचा प्रति किलोचा दर तब्बल 730 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 55,010 रुपयावर गेला आहे.

---Advertisement---

जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात मागील दोन दिवसात सोन्याच्या भावात घसरण झाली होती. मात्र आज सोने पुन्हा महागले आहे. आज जळगावातमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 47,100 रुपये इतका आहे. यापूर्वी काल 46,730 रुपये इतका होता. तर आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,350 रुपायांपर्यंत आला आहे. काल सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 51,000 इतका होता. आज चांदीचा एक किलोचा भाव 55,500 रुपये इतका आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्यात आणखी घसरणार?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरावर दबाव आहे. देशात आता सणासुदीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढते. मात्र, दिवाळीपर्यंत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता अल्पावधीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---