Jalgaon Gold : सोनं स्वस्त, चांदी महागली, वाचा आजचे प्रति तोळ्याचा भाव

ऑक्टोबर 8, 2021 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । भारतातील एका सर्वात महत्त्वाच्या सणाला सुरुवात झाली आहे. हा सण म्हणजे नवरात्रौत्सव. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये काल नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीमध्ये तेजी दिसून आली. काल गुरुवारी जळगाव सराफ पेठेमध्ये सोने आणि चांदीच्या भावात वाढ नोंदविली गेली होती. परंतु आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. आज सोने प्रति १० ग्रॅम ९० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या भावात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. आज चांदी प्रति किलो २६० रुपयाने महागली आहे.

gold silver 1

आजचा सोने आणि चांदीचा भाव 

आज जळगाव सराफ बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,९२० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६२,६९० रुपये इतका आहे.

सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली. जळगाव सराफ बाजारात पाच दिवसात सोने तीन वेळा स्वस्त तर दोन वेळा महागले आहे. तर चांदीच्या भावात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. काल गुरुवारी चांदीच्या भावात किंचित १० रुपायची वाढ झाली होती. पाच दिवसात चांदीच्या भावात १६८० रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या आठवड्यात सोन्याच्या भावात काहीशी वाढ झालीय.

दरम्यान, १ जानेवारी २०२१ ला प्रति १० ग्रॅम (२४ कॅरेट) सोन्याचा भाव ५१,३३० रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे ३२३० रुपयांनी घट झाली. तर या महिन्यात सोन्याच्या प्रति १० ग्रॅम ची किंमत ४७,९२० रुपयांपर्यंत खाली आली. चांदीत देखील मोठा बदल दिसून आला आहे. १ जानेवारी २०२१ ला चांदीचा प्रति किलोचा भाव ६९,७०० रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत ७ हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,६९० रुपयांवर आला आहे.

४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत असे होते सोने दर?

सोमवारी (४ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३७० होते, त्यात ४० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,९९० इतका होता. त्यात काल ६२० रुपयाची मोठी वाढ झाली होती. बुधवारी (६ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,८५० रुपये इतका आहे. तर गुरुवार (७ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४८,०१० रुपये इतका आहे. आणि आज (८ ऑक्टोबर) १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,९२० रुपये इतका आहे.

बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके शुद्ध सोने म्हटले जाते.

सोने साठवणुकीबाबत नवे नियम
सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दरही गगनाला भिडल्याने या सोन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम केले आहेत.

या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वास्तविक घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले कितीही सोने नागरिक आपल्या घरात ठेवू शकतात. फक्त त्याचे पुरावे खरेदीदाराकडे असायला हवेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार, नागरिक आपल्या घरात सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकतात. मात्र, प्राप्तिकर विभागाकडून घरातील किंवा बँकेच्या लॉकरमधील सोन्याची तपासणी होऊ शकते. अशा तपासणीच्या वेळी सोन्याचा स्रोत तुम्हाला पुराव्यांसह सांगता आला पाहिजे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now