ऐन लग्नसराईत सोन्याने ऐतिहासिक पातळी गाठली ; किंमत ऐकूनच खरेदीदारांना फुटला घाम..

मे 6, 2023 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींना बसला आहे. सोन्याच्या किमतीने कोरोना लॉकडाऊन दरम्यानचा उच्चांक दरही मोडीत काढला असून नवीन उच्चांक गाठला आहे. ऐन लग्नसराईमध्ये सोन्याचा किमतीने ऐतिहासिक पातळी गाठल्याने खरेदीदारांना घाम फुटला आहे. विना जीएसटी सोन्याच्या किमतीने 62 हजाराचा टप्पा गाठला आहे. Gold Silver Price Today

gold silver 1 jpg webp

सोन्याचा दर? Gold Rate
सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,100 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 64,000 रुपयापर्यंत गेला आहे. येत्या दीड महिन्यात सोन्याचा भाव 65000 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चांदीचा दर? Silver Rate
यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात कालच्या किमतीपेक्षा 800 रुपयापर्यंतची वाढ झालेली दिसून येत आहे. या वाढीमुळे आता चांदीचा भाव 77, 800 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदी लवकरच 85000 हजार रुपयाचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली. सोन्याचा दर 63 रुपयांनी वधारला असून यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 61,556 प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदी दर 147 रुपयांनी वाढला असून एक किलोचा चांदीचा दर 78,185 रुपयांवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now