जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याचे दर सातत्यानं वाढत असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहेत. दरम्यान आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे चांदी दराने देखील उसळी घेतली आहे. आज सकाळच्या सत्रात चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयापर्यंतची वाढ झाली.

सोन्याचे दर
goodreturns.in वेबसाईट नुसार आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचे दर ६०० रुपयांनी वाढून ते १,३८,८२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत. तसेच ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी वाढले असून १,११,०५६ रुपये झाले आहेत. आज २४ कॅरेटसोबतच २२ कॅरेट सोन्याचे दर ५५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२७,२५९ रुपये झाले आहेत.

चांदीचा दर
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरात मोठी वाढ झालीय. आज चांदीचा एक किलोचा दर ५००० रुपयांनी वाढून २,५३,००० हजार रुपयांवर पोहोचले आहे.

जळगावात काय आहेत सोने-चांदीचे दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोने १३३९ तर चांदीने ११,४३० रुपयांची उसळी घेतली. नवीन वर्षातील पहिल्या पाच दिवसात सोने २७३१ (२%) तर चांदी ११,४३० रुपयांनी (४.७२%) वाढली आहे. जळगावच्या सराफा बाजारात ५ जानेवारीला सोने १,४०,५९५ रुपये तोळा तर चांदी २,५३,४८० रुपये किलोवर पोहोचली. अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईमुळे भूराजकीय तणाव निर्माण झाल्यामुळे सोने-चांदी दरात वाढ झाली असून आगामी दिवसात दोन्ही धातूंचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.







