जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत घसरण, ‘हा’ आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । सोने– चांदीच्या दरात चढ उतार कायम सुरूच आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येतेय. तर चांदी देखील महागलेली दिसतेय. दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसतेय. Gold Silver Price Today
जळगाव सुवर्णनगरीत सोने घसरले?
धनत्रयोदशी, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (Gold Price Today) सोने चांदी खरेदी मोठ्या प्रमाणा झाली असताना सोन्याचे दर खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात अर्थात सोमवार १८ ऑक्टोबरला सोने ५० हजार ७०० रुपयांवर होते. यानंतर धनत्रयोदशीला सोन्याचे दर ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. तेच दर लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ३०० रुपयांनी कमी होऊन ५१ हजार २०० रुपये झाले. तसेच दिवाळीनंतर देखील सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. सध्या सोन्याचा भाव ५१,००० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 58,300 रुपयापर्यंत आहे. दरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसात सोन्याच्या किमतीत जवळपास ५०० रुपयाची घसरण दिसून येतेय.
दरम्यान, दिवाळी (Diwali) झाल्यानंतर तुळशीविवाह होऊन लग्नसराईला सुरुवात होईल. या दरम्यान, सोन्याची मागणी आणखी वाढणार आहे. यात गेल्या महिन्यात ५२ हजार रुपयांच्या पुढे गेलेले सोन्याचे भाव आता ५० ते ५१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र लग्नसराईमध्ये सोने- चांदीचे भाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे सध्याच्या भावात सोने घेणे फायदेशीर ठरणार आहे.
MCX वरील सोने-चांदीचे दर?
बुधवारी , वायदे बाजारात सकाळी ११ वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव किंचित १५ रुपयांनी वाढून ५०,६४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर ३६ रुपयांनी वाढून ५८,०९१ रुपयावर व्यवहार करत आहे.