---Advertisement---
वाणिज्य

एकाच दिवसात चांदीत 1000 रुपयांची वाढ, सोनेही महागले, पहा आजचे नवीन दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । देशात लग्नसराईला सुरुवात झाली असून मात्र याच काळात दरम्यान, सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची मालिका पाहायला मिळतेय. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात कमाली वाढ झाली. आठवडाभरात चांदीच्या प्रती किलोच्या दरात १७०० रुपयांची वाढ झाली. तर सोनेही ८०० ते ९०० रुपये प्रति तोळ्याने महागले आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

जळगावमधील सोने चांदीचा भाव?
जळगाव सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५७,२०० रुपयावर आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ६२,४०० रुपयावर आहे. दुसरीकडे चांदीचा दर तब्बल ७६००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. काल सोमवारी ७६००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

---Advertisement---

गेल्या सोमवारी चांदी चे प्रती किलोचे दर ७४३०० होते. ते शनिवार व रविवारी ७५००० झाले. तर सोमवारी ७६००० वर दर पोहोचले. नोव्हेंबर महिन्यात चांदीच्या दरात तब्बल ४४०० रुपयांची तेजी आली. १ नोव्हेंबर रोजी चांदीचे प्रती किलोचे दर ७१६०० होते. चांदीच्या मागणीत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याने दरात वाढ झाल्याचे सराफा बाजारातील जाणकार सांगतात.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर
दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर देखील सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली होती. या काळात सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ झाली, तर चांदीचा भाव ७४० रुपयांनी वाढला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज मंगळवारी सकाळी सोने ०.१३टक्क्यांनी म्हणजेच ७९ रुपयांच्या वाढीसह ६१,६१९ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करत आहे. तर चांदी ०.२० टक्क्यांनी म्हणजेच १४८ रुपयांच्या घसरणीसह ७४,६५८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---