---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

आज सोनं-चांदी झाली स्वस्त ; जाणून घ्या आजचे जळगावातील ताजे दर

gold rate (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५  जून २०२१ । जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीवर संकट निर्माण केलं आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरण होतानाचे दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात काल स्थिर राहिलेल्या सोन्याच्या भावात आज शुक्रवारी घट झाल्याचे दिसून आले आहे. आज सोन्याच्या दर प्रति १० ग्रम ११० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी देखील स्वस्त झाली आहे. आज चांदी ३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

gold rate (1)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या राज्यातील लॉकडाऊनमध्ये १ जुलैपासून व्यवसायांना सूट मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सोन्याच्या झळाळीला काहीशी उतरती कळा लागल्याचे दिसून आले आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. आज दोन्ही धातूंमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यापूर्वी काल सोन्याचा दर स्थिर होता. तर आज चांदीत २०० रुपयाने महागली होती. 

---Advertisement---

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅम चा ४५,२३० रुपये आहे.

 चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात ३०० रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,१०० रुपये इतका आहे.

 आगामी काळात सोने चांदीचे दर कसे असणार?

तज्ज्ञांच्या मते, “भारतात सध्या कोणताही उत्सव किंवा सण नाही. याशिवाय खरेदी विक्रीचा लग्नाचा काळही संपलाय. तसेच सोन्यावरील हॉलमार्किंगचे नियम लागू झालेत. या सर्वांचा सोन्याच्या बाजारावर परिणाम झालाय. त्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर स्थिर राहतील किंवा कमी होतील.

भारतातील गुंतवणूकदार सध्या सोने चांदीच्या किमती आणखी कमी होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सोने दरात जशी वेगाने पडझड होईल तशी गुंतवणूक वाढून या किमती पुन्हा वेगाने वाढतील. त्या परिस्थितीत सोन्याच्या दरात थोडीशी सुधारणा होईल. मात्र, सध्यातरी तशी कोणतीही स्थिती नाही. चांदीच्या दरातही अशाचप्रकारे वाढ होताना दिसेल. बाजार खुले झाल्यास चांदीची औद्योगिक मागणी वाढेल. त्यामुळे चांदीचे दरही वाढतील.”

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---