सोने -चांदीचे दर पुन्हा रेकॉर्ड तोडणार? आज पुन्हा झाली वाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२२ । भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीची वाढ सुरूच आहे. आज सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा मोठी आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.40 टक्क्यांने वाढला आहे. सोबतच चांदीचा दर (Silver Price Today) देखील 1.05 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. काल सोन्या-चांदीचे भाव वायदे बाजारात वाढीसह बंद झाले.
गुरुवारी, वायदे बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 200 रुपयांच्या वाढीसह 52,650 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याचा भाव आज 52,500 रुपयांवर उघडला. उघडल्यानंतर थोड्याच वेळात एकदाची किंमत 52,688 रुपयांवर गेली. नंतर किंमत थोडी कमी झाली आणि ती 52,650 रुपये झाली. काल MCX वर सोन्याचा भाव 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 52,470 रुपयांवर बंद झाला.
चांदीही वाढली
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी उसळी आली आहे. आज चांदीचा भाव 569 रुपयांनी वाढून 62,199 रुपयांवर आहे. काल चांदीचा भाव वायदा बाजारात 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 61,640 रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरले, चांदी वधारली
आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती वेगवेगळ्या पद्धतीने फिरत आहेत. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरून $1,738.14 प्रति औंस झाला. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत आज उच्च आहे. आज चांदी 0.78 टक्क्यांनी वाढून 21.25 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.