⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | सोन्याने गाठला पुन्हा 63 हजाराचा टप्पा ; चांदीने.. ; आजचे ताजे दर तपासून घ्या

सोन्याने गाठला पुन्हा 63 हजाराचा टप्पा ; चांदीने.. ; आजचे ताजे दर तपासून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२३ । मागच्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे लग्नाचा धुमधडाका सुरु असून याच दरम्यान, सोन्यासह चांदीने उसळी घेतली. सोन्याचे दर पुन्हा गगनाला पोहोचले आहे. दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, त्यानंतर सोन्याला झळाळी पाहायला मिळाली आहे. Gold Silver Price 23 December 2023

दरम्यान, सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे.मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी संध्याकाळी 7.20 वाजता सोन्याचा भाव 1.04 टक्क्यांच्या वाढीसह 63150 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. त्याच वेळी, एमसीएक्सवर चांदीची किंमत 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 75866 रुपये प्रति किलो आहे. दरवाढीने देशातील सराफा बाजारात सोन्याचा भाव 63 हजारावर गेला आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही ७७ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव सराफ बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर विनाजीएसटी 57,800 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 75500 रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.