---Advertisement---
वाणिज्य सोने - चांदीचा भाव

खुशखबर.. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, ‘हा’ आहे आजचा भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । जर तुमचीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याची योजना असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. यापूर्वी सोमवारी देखील सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. आज पुन्हा सोने किंचित १० रुपयांनी घसरले आहे. तर चांदी २२३ रुपयांनी घसरली आहे. Gold Silver Price Today

gold silver 1 jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सोन्याचा भाव घसरून ५१,१६० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आले. तर चांदीचा एक किलोचा भाव ५४,७६९ रुपयांवर आले आहे. गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर सोने ११०६ रुपयांनी, तर चांदी ३७८० रुपयांनी घसरली होती. दरम्यान,उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

---Advertisement---

जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या घसरणीनंतर जळगावमध्ये सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५२,१५० रुपये इतका आहे. तर सध्या चांदीचा भाव ५६,४०० रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

महाराष्ट्रातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,९२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,६२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५० रुपये आहे.

मिस्ड कॉल देऊन दर तपासा
आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्या-चांदीचे नवीनतम दर तपासू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एका नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---