जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । जागतिक घडामोडीचा परिणाम सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीवर होतात. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमती खालीवर होत असल्याने ग्राहकही संभ्रमात आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होणारी वाढ आज (बुधवार) थांबली. त्यामुळे आज दोन्ही धातूंच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. Gold Silver Rate Today
सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बुधवारी सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे 10 रुपयांनी तर चांदीचा भाव 380 रुपयांनी घसरला. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,533 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,490 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 72,170 रुपये प्रति किलोवर आला. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.10 टक्क्यांनी म्हणजे 58 रुपयांनी घसरला आणि 59,224 रुपयांवर ट्रेंड सुरू झाला. तर चांदीची किंमत 0.51 टक्क्यांनी घटून 370 रुपये प्रति किलो 72,199 रुपये झाली आहे.
जळगावातील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,780 रुपये प्रति दहा ग्रॅम आह. 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 72,500 रुपये प्रति किलोवर विकला जात आहे.