जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसागणित वाढू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) सलग चौथ्या दिवशी मोठ्या किंमतीने महागली आहे. आज १२० रुपयाने महागले आहे. तर चांदी ७७० रुपयांनी वधारले आहे. त्यापूर्वी काल सोने २४० रुपयाने महागले होते. तर चांदीच्या दरात ४५० रुपयाची वाढ झाली होती.
जळगावातील आजचा भाव? (Gold Silver Price 13 January 2022)
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा बाजारपेठ बंद पडण्याची शक्यता असल्याने मागील काही दिवसापासून सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसू येतेय. या आठवड्यात सोने सलग तिसऱ्या दिवशी महागले आहे. तर चांदीच्या भावात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदविली गेलीय.
गेल्या तीन दिवसात सोने ३७० रुपयाने महागले आहे. तर दुसरीकडे गेल्या चार दिवसात चांदी १४०० रुपयांनी महागली आहे. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.
या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
हे देखील वाचा :
- बाबो..! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; भाव आणखी वाढणार का?
- सोन्याने घेतली उंच भरारी, चांदी देखील महागले,बघूया काय आहेत आजचे भाव…
- बोंबला! आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सोने चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेकडे.. आताचे भाव पाहिलेत का?
- ग्राहकांना दिलासा! सोने चांदी पुन्हा घसरली..आता कुठपर्यंत आले दर??
- आजचा सोने चांदीचा भाव ; कुठपर्यंत आला दर? तपासून घ्या