⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | दीड महिन्यात सोने 5000 रुपयाने महागले, चांदीनेही मोडला विक्रम ; पहा आजचे दर

दीड महिन्यात सोने 5000 रुपयाने महागले, चांदीनेही मोडला विक्रम ; पहा आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२३ । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोन्याने दराने रोज नवनवे विक्रम केले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 56 हजाराच्या आत असलेला सोन्याचा भाव आता 61 हजारांवर गेला आहे. चांदीच्या भावात देखील विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम सुटला आहे. दरम्यान, आगामी दिवाळीत सोने 65,000 रुपये आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते,असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहे आजचा सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत आज सोन्याचा भाव स्थिर दिसत आहे. आज गुरुवारी सकाळी 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,100 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. काल सकाळी देखील हाच दर होता. दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 56 हजाराच्या (विना जीएसटी) आत होता. मात्र त्यात गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. एकंदरीत जवळपास दीड महिन्यात सोन्याच्या भावात तब्बल 5 हजार रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. दिवाळीपर्यंत सोने 65 हजार रुपयावर जाण्याची शक्यता आहे.

आजचा चांदीचा दर काय?
दुसरीकडे चांदीच्या किमतीने आज पुन्हा वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी चांदीचा एक किलोचा भाव 76,500 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी चांदीचा दर 76000 रुपये इतका होता. म्हणजेच त्यात एका दिवसात 500 रुपयाची वाढ झाली आहे.

दीड महिन्यापूर्वी चांदी 12000 रुपयांनी वधारली
दरम्यान, गेल्या दीड महिन्यापूर्वी चांदीचा दर 64 हजार रुपयाच्या घरात होता. तो आता 76 हजारावर गेला आहे. म्हणजेच दीड महिन्यापूर्वी चांदी 12000रुपयाची वाढ झाली आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचे सोने-चांदीचे दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. आज गुरुवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दराने नवीन पातळी गाठली. गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास एमसीएक्सवर 24 कॅरेट सोने 180 रुपयांनी वाढून 60628 रुपये प्रति 10 ग्रॅम व्यवहार करत आहे. सोबतच चांदी 291 रुपयांनी वाढून 76,204 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती. त्याआधी बुधवारी चांदीचा भाव 75913 रुपये आणि सोन्याचा भाव 60628 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

दरम्यान, काही दिवसावर अक्षय तृतीय सारखा सण येऊन ठेपला आहे. यंदा हा सण 22 एप्रिल रोजी आहे. यादिवशी या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना घाम आला आहे. पुढील आठवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63 हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

हॉलमार्कचा संबंध
24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.