जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सततच्या वाढीनंतर मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. जागतिक बाजारातही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने स्वस्त झाले आहे. Gold Silver Rate Today
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने किंचित 26 रुपयांनी घसरले आहे. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 61,244 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर देखील 251 रुपयांनी घसरला असून यामुळे एक किलो चांदी 76,437 रुपयावर व्यवहार करत आहे.
काय आहे जळगावातील सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,700 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 56,800 रुपये होता.
तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,800 रुपये(विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 61,700 रुपये इतका होता. येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे.
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. सध्या चांदीचा एक किलोचा दर 78,000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 76,800 रुपये होता. मात्र आगामी काही दिवसात चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.