जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२५ । सोन्याच्या किमतीत सुरु असलेली दरवाढ काही थांबताना दिसत नसून नव्या आठवड्याची सुरुवात देखील सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी फारशी चांगली नाहीये. कारण आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढल्याचं दिसत आहे.

सध्या सगळीकडे लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याचा नवनवीन उच्चांक गाठताना दिसत असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागत आहे.
किती रुपयांनी महागले आज
आज सोमवारी (10 फेब्रुवारी 2025) सोन्याच्या दरात तेजी कायम पहायला मिळत आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 390 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 87,060 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. गेल्या महिन्याच्या 20 जानेवारीपर्यंत हाच भाव 81 हजार रुपये होता. सोन्याची भाववाढ अशीच होत राहिल्यास कदाचित वर्षभरात तो एक लाख तोळापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकेत सत्ताबदलानंतर धोरणांमध्ये झालेले बदल, कॅनडामधील बँकेचे कमी झालेले व्याजदर, यामुळे सोन्याच्या दरांत वाढ झाली आहे. यामुळे सध्या भाववाढीमुळे आता सोन्याची जेमतेम खरेदी-विक्री सुरू आहे. केवळ लग्न, मुंज किंवा अन्य घरगुती कार्यक्रम असणारी मंडळीच सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे सोनसाखळी, अंगठी, मंगळसूत्राची खरेदी केली जात आहे.
आजही चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. आजही चांदीचा भाव प्रति किलो 96000 रुपये आहे. जर त्यात जीएसटी जोडला तर त्याची किंमत प्रति किलो 98880 रुपये होईल,