जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । जूननंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा (Gold Price) दर 59 हजाराखाली आला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 70 हजाराखाली आला आहे. आज गुरुवारी सकाळी बाजार सुरु होताच सोने आणि चांदीच्या (Silver Price) किमतीत घसरण दिसून आली. जुलै महिन्यात सोने-चांदीला बळ मिळाले होते. पण ऑगस्ट महिन्यात घसरण सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. तर या आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने-चांदीत पडझड सुरुच आहे. Gold Silver Price Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील (MCX) दर?
कमोडिटी एक्सचेंवर MCX वर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) किंचित घसरून 58,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे भाव 139 रुपयांनी घसरून 69,833 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात सोने-चांदीच्या किमतीने विक्रमी पातळी गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. त्यावेळी सोन्याचा दर 63 हजारापर्यंत गेला होता. तर चांदीचा दर 77 हजारांवर गेला होता. मात्र मे आणि जून महिन्यात घसरण होऊन सोन्याचा दर 58 हजाराच्या घरात गेला होता. तर चांदीचा दर 69 हजाराच्या आत आला होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने-चांदीत घसरण दिसून आली.
मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंनी पुन्हा उच्चांकीकडे वाटचाल केली होती. मात्र जून महिन्यात सोने चांदीचा दर घसरला होता. दोन महिन्यानंतर सोने आणि चांदीचा दर खाली आला.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,500 रुपायांवर गेला आहे. एक किलो चांदीचा दर 71000 रुपये इतका आहे. दरम्यान, कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर 72000 हजारावर होता. त्यात एक हजार रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.