---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

आजचा सोनं आणि चांदीचा भाव : ०३ ऑगस्ट २०२१

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. कालच्या घसरणी नंतर आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दर स्थिर दिसून आला आहे. तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव जैसे थे असून चांदीच्या भावात ४० ते ५० रुपयाची वाढ झाली आहे.

gold silver 7

गेल्या जुलै महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आले. परंतु ऑगस्टच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आलीय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

---Advertisement---

मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. आतादेखील सोन्याचा दर साधारण ४९ हजार रुपये प्रतितोळ्याच्या आसपास आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती ५२ हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,८४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,४९० रुपये इतका आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६९,५०० रुपये इतका आहे.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---