आजचा सोनं आणि चांदीचा भाव ; ०२ जुलै २०२१

जुलै 2, 2021 9:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । मागील महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले होते. परंतु आज दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

gold silver (3)

जळगाव सराफ बाजारात आज सोने प्रति १० ग्रम २१० रुपयाने वाढले आहे. तर चांदी देखील महागली आहे. आज शुक्रवारी चांदी १२०० रुपयांनी वाढली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी सोने प्रति १० ग्रम २१० रुपयाने स्वस्त झाली होती. तर चांदी ४०० रुपयाने स्वस्त होती.

मागील काही दिवसांपासून जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आलीय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात  ५६२०० रू.विक्रमी पातळीवर गेलेले सोने आता ४८ हजाराच्या आत आले आहे. जळगाव सराफ बाजारात मागील महिन्यात सोन्याचा भाव दीड हजाराहून अधिकने कमी झाले.  

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५२३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,२३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदीच्या भावात १२०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,१०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now