⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | दिवाळीपर्यंत सोनं पुन्हा महागणार? आजचं खरेदी करा सोने आणि चांदी

दिवाळीपर्यंत सोनं पुन्हा महागणार? आजचं खरेदी करा सोने आणि चांदी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात ३२० रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरात ९०० रुपयाची घसरण झाली आहे.

काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. काल शनिवारी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १५० रुपयाने तर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १५० रुपयाने महागले होते. तर चांदी ४०० रुपयाने महागली होती.

जळगाव सराफ बाजारात गेल्या महिन्याभरात ७०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. जून महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास २००० हजार रुपयाची घट झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

सोन्यामधील घसरण ग्राहकांसाठी मात्र खरेदीची संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ५२५०० रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून आलं आहे. १९ जुलैला चांदीच्या दरात ३०० रुपयांची घसरण, २० जुलैला ६०० रुपयांची घसरण, २१ जुलैला ८०० रुपयांची घसरण झाली होती. २२ तारखेला ४०० रुपयांची वाढ तर २३ जुलैला पुन्हा एकदा ४०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या भावाने ७० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. 

सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८१७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८, १७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४,५८८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५, ८८० रुपये आहे.

चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ७२, ३०० रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.