जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । भारतीय सराफा बाजार सतत वेगाने वाढत आहे. सोने-चांदीने गेल्या दोन दिवसांत इतिहास रचला असून किंमती गगनाला भिडल्या. ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे दर दररोज महाग होत असल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, शुक्रवारीही दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ दिसून आली. आज 1 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव 40 रुपयांनी वाढला होता. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,466 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,690 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 70 रुपयांनी वाढून 77,470 रुपये किलो झाला.
MCX वर सोन्या-चांदीची किंमत
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी वाढून 29 रुपयांनी 62,669 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. तर चांदीचा भाव 0.14 टक्क्यांनी वाढून 111 रुपयांनी 77,626 रुपये प्रति किलो झाला. परदेशी बाजारात, यूएस कॉमेक्सवर, सोने 0.15 टक्क्यांनी म्हणजेच $3 च्या वाढीसह $2,041.10 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदी 0.01 टक्क्यांनी वाढून $25.29 प्रति औंसवर आहे.
जळगाव सराफ बाजारातील दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 57,900 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 63,300 रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर तब्बल विनाजीएसटी 77,500 रुपयावर विकला जात आहे.