जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२५ । दिवाळीच्या दिवसात सोने-चांदीची खरेदी केलेली शुभ मानले जाते. मात्र ऐन दिवाळी तोंडावर सोन्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सोन्याची किंमत पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, आज 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीच्या दिवशी सोने दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर
आज सोमवारी १ तोळा सोन्याचे दर १७० रुपयांनी घसरले आहे. हे दर १,३०,६९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १३६ रुपयांनी घसरले आहेत. हे दर सध्या १,०४,५५२ रुपये असतात.

२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याचे दर १,१९,८०० रुपये प्रति तोळा आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९५,८४० रुपये झाले आहेत.हे दर १२० रुपयांनी घसरले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
१ तोळा सोन्याचे दर १२० रुपयांनी कमी झाले आहेत.हे दर सध्या ९८,०२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,४१६ रुपये झाले आहेत.











