ग्राहकांना दिलासा ! स्वातंत्र्यदिनी सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या नवीन दर

ऑगस्ट 15, 2025 12:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । देशात सणासुदीच्या काळात अनेक जण सोने आणि चांदी खरेदी करतात. मात्र यंदा दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. गेल्या आठवड्यात सराफ बाजारात सोन्याचा दर १ लाख ४ हजारापर्यंत पोहोचला होता. मात्र या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आली. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

gold silver rate jpg webp

स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,२४० रुपये आहेत. ८ कॅरेट सोन्याचे दर ८०,९९२ रुपये आहेत.

सोबतच २२ कॅरेट सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहे. प्रति तोळ्याचे भाव ९२,८०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,२४० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,२८,००० रुपये आहेत. या दरात १००० रुपयांची घसरण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now