गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा घवघवीत यश!

एप्रिल 19, 2025 2:50 PM

बी.एससी. नर्सिंग तृतीय व चतुर्थ सेमिस्टरचा ९०% निकाल

bsc gd

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या बी.एससी. नर्सिंग तृतीय व चतुर्थ सेमिस्टरच्या निकालात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गौरव मिळविला आहे.

महत्वाचे म्हणजे तृतीय सेमिस्टरचा निकाल ९०% लागला असून, महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ठळक छाप उमटवली आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव सौ. वर्षा पाटील, संचालक डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील, प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, उपप्राचार्य प्रा. जस्मित दया, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रवीण कोल्हे आणि सर्व शिक्षकवृंद, टीचिंग व नॉन-टीचिंग स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीसह शिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच संस्थेच्या नियोजनशील व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले आहे.

संस्थेच्या वतीने भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.-इ.डल. नर्सिंग – तृतीय सेमिस्टर यशस्वी विद्यार्थी :प्रथम: माहेश्वरी लखनपुरे – ७३.६६%द्वितीय: दिव्या गुल्हाने – ७३.६%तृतीय: ख़ुशी भोळे – ७३.६%चतुर्थ: ऋषिका चौधरी – ७३.३३%पाचवा: पायल तगाडे – ७३%सहावा: अंकिता नरवाडे – ७२.६६%इ.डल. नर्सिंग – चतुर्थ सेमिस्टर यशस्वी विद्यार्थी: प्रथम: मुक्ता पवार – ७५.७१%द्वितीय: सानिका महाले – ७५.१४%तृतीय: तोनिशा गुडे – ७४.२८%चतुर्थ: काजल वाडीले – ७४.२८%, मेविश शेख – ७३.१४%पाचवा: आरती बालक – ७२%, प्रियांका इंगळे – ७२%

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment