⁠ 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससीचा निकाल जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज : २२ सप्टेंबर २०२३ : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंग चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात नारायणी कदम यांनी ७६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक वैष्णवी भुटे यांनी ७४ टक्के, तृतीय क्रमांक प्रणाली घोडे यांनी ७४ टक्के गुण, मिळवून, चौथा अजिंक्य वाघमारे ७३.२०, पाचवा आकांक्षा झिरे ७२ तर सहावी आकांशा डेबजे ७१.८० प्राप्त करत यश प्राप्त केले आहे.

महाविद्यालयाचा ९० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्या डॉ केतकी पाटील, हृदयविकारतज्ञ डॉ वैभव पाटील, गोदावरी नर्सिंग प्राचार्य प्रा विशाखा वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, शिवानंद बिरादार यांचेसह संपूर्ण शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.