जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे जळगाव खुर्द येथे गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी गोदावरी फार्म फ्रेशचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. शेतातील ताजा व स्वच्छ माल तसेच कृषी महाविद्यालयात निर्मित अन्य उत्पादनेही येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
कृषी महाविद्यालयाकडून पिकविलेला स्वच्छ आणि ताजा भाजीपाला याचप्रमाणे, महाविद्यालयाकडून निर्मित अनेक उत्पादने येथे विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. या महाविद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमामुळे भुसावळ जळगाव राष्ट्रीय महामार्ग ०६ वरील प्रवास करणार्या नागरिकांना एक सर्वांग सुंदर अशी मेजवानीच ठरणार आहे.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे गोदावरी फार्म फ्रेशचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी आजी, सचिव डॉ.वर्षा पाटील, परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च डॉ.अशोक चौधरी, अॅग्री कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.शैलेश तायडे, डॉ.पी.आर.सपकाळे, डायरेक्टर ऑफ हॉर्टीकल्चर प्रा.सतीश सावके, कृषी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अतुल बोंडे, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.