जळगाव जिल्हा

गोदावरी क्रिकेट लिग: काट्याच्या लढतीत डियूपीएमसीचा 14 धावांनी विजय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड जीएमसीचा पराभव ; चेतन पाटील ठरला सामनावीर

जळगाव लाईव्ह न्यूज । 13 मार्च 2024 । जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे नुकतेच गोदावरी क्रिकेट लिगचे आयोजन करण्यात आले होते. यात मुले आणि मुलींच्या अंतिम सामन्यात गोदावरी वैद्यकिय महाविद्यालयाचे संघ विजेते ठरले.

मुलांच्या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून ३४ संघ तर मुलींचे ४ संघ सहभागी झाले होते. लिग पध्दतीने खेळवलेल्या या स्पर्धेत ८ गु्रप पाडण्यात आले होते. दि ७ मार्च ते १२ मार्च पर्यंत चाललेल्या या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय संघाने अधिरथ संघाचा ५२ धावांनी पराभव करत फायनलला धडक मारली तर नांदेड जीएमसीने धुळे जीएमसीचा १८ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत डीयुपीएमसी व नांदेड जीएमसीचा सामना अत्यंत चुरशीचा झाला.

काटयाच्या लढतीत डीयुपीएमसीने १४ धावांनी विजय मिळवत नांदेड जीएमसीला धुळ चारली सलग दुस—या वर्षी हे विजेतेपद पटकावले. या सामन्यात सामनाविर पुरस्कार चेतन पाटीलने पटकावला. तर मुलींच्या अंतिम सामन्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय अगस्त बॅचने इंटर्न संघाचा पराभव केला.पंच म्हणून अक्षय बारोटे,श्रीयांशू सावरकर यांनी काम पाहीले.अंतिम सामन्यात डॉ अक्षय बारोटे आणि डॉ. वैभव देशमुख यांनी पंच म्हणून काम पाहीले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख १५००० व चषक तर उपविजेत्यांना १०००० व चषक तर मुलींना चषक प्रदान करण्यात आले तर मॅन ऑफ द सिरीज जीएमसी नांदेडचे डॉ वैभव हराळ यांना रोख ३००० व चषक प्रदान करण्यात आला. यशस्वीतेसाठी अभ्युदय इंटर्न बॅचचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button