जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)हे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा सभा कधी घेणार, याची उत्सुकता मनसैनिकांना लागली होती. अखेर राज ठाकरे यांनी मंगळवारी रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरी शैलीत भाषण केलं.

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील टोल नाक्यावरून महाविकास आघाडीसह भाजपावर टीका केली. राज ठाकरे आणि मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो. त्यांनी एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. टोलचं आंदोलन. 65 ते 67 टोल आपण बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो, असे आवाहनच राज ठाकरे यांनी केले आहे.
सेना भाजपाच्या (BJP) जाहीरनाम्यात म्हटलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करू. त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. मला वाटतं या गोष्टी तुम्हाला जिल्हा तालुक्यात शहरात बोलतता तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले. तुमच्या पक्षांनी काय केलं. आश्वासन देऊनही तुम्ही बंद केलं नाही हे सांगितलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
टोलवरून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. आपला पहिला मुद्दा होता तो हा की टोल. जगभरात टोल. टोलवर पैसा गोळा करतो. त्यातून ब्रिज आणि रस्त्याची रक्कम गोळा करतात. आपला प्रश्न होता हे टोल किती वर्ष राहणार आणि किती पैसे गोळा होतात. ती कुणाकडे जातो. ही कॅश रोज कुणाकडे जाते. त्याचं पुढे होतं काय. याची कोणतीही उत्तरं आजपर्यंत सरकारकडून दिली गेली नाही, असा आरोप त्यांनी केला. आजपर्यंत आपल्या पक्षांनी जेवढी आंदोलने केली तेवढी आंदोलने कोणी केली नाही. आम्ही केली आणि ती यशस्वी केली, असा दावा करत काढा सर्व पक्षांचा इतिहास असे ते म्हणाले.