⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला! गिरणा धरण १०० टक्के पूर्ण भरण्याच्या मार्गावर

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला! गिरणा धरण १०० टक्के पूर्ण भरण्याच्या मार्गावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगावसह खान्देशासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या (Girna Dam) पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणत आवक होत असून धरण आता १०० टक्के पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

यंदाच्या पावसाळ्याचे जवळपास तीन महिने उलटून आले. तरी गिरणा धरण निम्मेही भरले नव्हते. यामुळे जळगावकरांची चिंता वाढली होती. मात्र काही दिवसापासून विश्रांतीनंतर राज्यात पावसाने जोरदार कमबॅक केलं. नाशिक जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. गिरणा खोऱ्यात व पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कसमा पट्ट्यातील धरणे भरलेली असल्याने नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणात 35 हजार ते 40 हजार क्यूसेक पाणी आवक सुरु आहे.

त्यामुळे कुठल्याही क्षणी आता गिरणा धरण 100 टक्के भरू शकते.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यासह नदीकाठचे गावे गिरणा नदीवर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पाणी टंचाई निर्माण झाली होती. उष्णतेची तीव्र दाहकता लक्षात घेता, या गावांना पिण्याची, पाणीटंचाई जाणू लागली. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागली होती. आता चांगला पाऊस बरसला असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर खान्देश शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, मागील वर्षी पावसाळा ऋतूत कमी प्रमाणात पाऊस पडला होता. मागील वर्षी गिरणा धरणात 57 टक्के पाणीसाठा होता. सध्या स्थितीत गिरणा धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. सध्या धरणात पाण्याची अवाक होत असून गिरणा धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असून कोणत्याही क्षणी विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता असून खबरदारी म्हणून गिरणा नदी काढच्या गावांना सुरक्षितेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.