जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मी जिवंत सोडणार नाही.. असं म्हणत संतप्त तरुणीने तरुणावर धारदार चाकूने हल्ला करून तरुणास जखमी केल्याची धक्कादायक घटना पाचोऱ्यातील तलाठी कॉलनीत घडली. निलेश बोरसे असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी जखमी तरुणाच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणीविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील तलाठी काॅलनी येथील रहिवाशी निलेश दिलीप बोरसे यांचे विरुद्ध पाचोरा येथील तरुणीने सन – २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तद्नंतर वेळोवेळी तरूणी मुलाकडे माझ्या शी लग्न कर असा तगादा लावुन धरला होता. दरम्यान मुलाला नोकरी लागली. मात्र तरुणीने ही त्या तरुणाच्या नोकरीच्या ठिकाणी जावुन त्यास माझ्याशी लग्न कर अशी मागणी करत असल्याची माहिती पीडित तरुणाने बहिणीला दिली होती.
दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी तरुणाच्या घराबाहेर आरोपी तरुणीने तरुणाला पाहुन शिवीगाळ करत गेट उघडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरुणाच्या आणि यांनी तरुणी हिस शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. दरम्यान तरुणी हिने तिच्या जवळील चाकु काढुन मारणार तितक्यात तरुणाच्या वडिलांनी आरोपी हिचा हात धरला असता तरुणीने हिने त्यांना यांना लाथ मारली. त्यावेळी तरुण याचेसह गल्लीतील नागरिकांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला.
मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने पुन्हा यास माझ्याशी लग्न कर नाहीतर तुम्हाला सर्वांना जिवंत सोडणार नाही. असे म्हणत असतांनाच हिने तिच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने मुलाच्या हातावर, मानेवर वार केले. या झटापटीत आरोपी मुलगी हिस आवरण्यासाठी गल्लीतील सतिष पाटील हे गेले असता त्यांना देखील चाकुने हाताला जखम झाली. घटनास्थळावरून पीडित मुलाचे आई व वडील दिलीप बोरसे व कमलाबाई बोरसे हे पोलिस स्टेशनला गेल्यानंतर, दरम्यान पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज येताच आरोपी ही घटनास्थळावरुन निघुन गेली. पीडित निलेश यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास परिवाराने येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी निलेश यांची बहिण व वडील दिलीप बोरसे यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत आरोपी तरुणी हिच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी हिस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे हे करीत आहे.