⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकट सोडल – गुलाबराव पाटील

गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकट सोडल – गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । एकीकडे भाजपा शिवसेनेत वैरच युद्ध सुरु असताना जळगावमध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात खेळीमेळीचे वातावरण पाहायला सगळ्यांनाच पाहायला मिळत आहे. ‘गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकट सोडल आणि आज रामनवमी निमित्ताने मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी सोबतही घेऊन गेले नाही’, असा चिमटा पाटलांनी महाजनांना काढला. ते जळगाव येथे एका शिबिरात बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले कि, आपण सोबत मंदिराच श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार होतो, असे आपले ठरले होते. मात्र, महाजनांनी जसे सरकारमध्ये मला सोडल तसे आज मंदिरात सोबत घेऊन न जाता एकटेच दर्शनाला गेले, असा मिस्किल टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये मात्र एकच हशा पिकला होता.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह