जळगाव जिल्हा

माजी मंत्री गिरीश महाजनांचे सुनील झंवर कनेक्शन?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । बीएचआर प्रकरणात पोलिसांनी नाशिक येथून मुख्य संशयीत सुनील झंवर याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, झंवरच्या कार्यालयातून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावे असलेला पिस्तूल परवाना क्रमांक एजेएम/२/९३ च्या झेरॉक्सची पाच पाने व रिव्हॉल्व्हर ३२ एमके १ युजर मॅन्युअल व सुनील झंवरचे शस्त्र परवाना नूतनीकरणबाबतचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे २५ फेब्रुवारी २००३ चे पत्र मिळाले. याशिवाय युनियन बँक ऑफ इंडियाचे ८३ डेबीट कार्ड, १०१ पासबुक व चेकबुकचाही देखील त्यात समावेश आहे.

कार्यालयात मिळालेली कागदपत्रे अशी
पाळधी ग्रामपंचायतचे कोरे लेटरपॅड, पायल नितील लढ्ढा यांचे सूरज यांच्याकडून लिहून घेतलेले भाडेकरार दस्तऐवज (२५ ऑगस्ट २०२०), दिया नितीनकुमार साहित्या व सुनील झंवर यांचे सामायिकातील खरेदीखत दस्त (२७ डिसेंबर २०१७), श्री साई मार्केटिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनीकडील भारतीय खाद्य निगम क्षेत्र टेंडरची डॉक्युमेंट झेराॅक्स फाइल, आदिवासी विकास आयुक्तालयाचे रबरी स्टॅम्प, राज्यभरातील सुमारे ५०च्या वर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे रबरी स्टॅम्प सन २००६च्या विधानसभा अधिवेशन आश्वासन क्रमांक १०५६ बाबत खासगी कंपनीचे दिंडाेरी तालुक्यात विकत घेतलेल्या कंपनीची कागदपत्रे आणि विविध ड्रायव्हिंग स्कूलच्या नावाचे ८३ डेबीट कार्ड मिळून आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button