⁠ 
शनिवार, जून 22, 2024

जळगाव आणि रावेरसाठी तिसऱ्या दिवशी किती उमेदवारांनी किती अर्ज घेतले? वाचा ही बातमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.20 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मनोज गौरीशंकर शर्मा, जळगाव (अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा यांनी श्रीमती तेजस्विनी ललित शर्मा जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी 4, पंकज दत्तात्रय पवार, कन्नड यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, अनिल विश्वासराव मोरे, जळगाव यांनी सतीश विश्वासराव मोरे जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी4, दिगंबर अशोक सोनवणे जळगाव( अपक्ष)1, किरण उत्तमराव वारुळे अमळनेर यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, नुरेजमील इसाभाई पटेल, जळगाव (अपक्ष )1, राजेंद्र सुभाष खरे, पळासखेडे तालुका जामनेर( बहुजन मुक्ती पार्टी)4, जितेंद्र भागवत केदार जळगाव( अपक्ष)1, दिलीप वसंत मराठे, जळगाव( अपक्ष)1, सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव( अपक्ष)2, धरमपाल हरिभाऊ इंगळे, मलकापूर( बहुजन समाज पार्टी)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा यांनी अनिल गंभीर मोरे, बोदवड( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण तेरा उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत.

04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत. त्यात रामेश्वर मनोहर लोहार, बोदवड( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, भिवराज रामदास रायसिंगे,चोपडा (अपक्ष ) 2, वसंत शंकर कोलते, जामनेर (अपक्ष )4, कुंदन टोपलू तायडे, यावल( अपक्ष)2, शेख आबीद शेख बशीर, मलकापूर (अपक्ष )2, एकनाथ नागो साळुंके उर्फ अण्णासाहेब साळुंके, जामनेर ( अपक्ष)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा ( बहुजन समाज पार्टी) 3 असे एकूण 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी संजय एकनाथ माळी, हनुमान नगर धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी दाखल केला.तर शनिवारी 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.