गिरीश महाजन म्हणाले, उध्दव ठाकरे बालिश, राऊत आऊट ऑफ…

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ सप्टेंबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अनिल पाटील उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलतांना गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. उध्दव ठाकरेंचे वक्तव्य बालिश असून त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असेही महाजन म्हणाले.

उध्दव ठाकरे यांची जळगावमध्ये नुकतीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राम मंदिरसाठी देशभरातून माणसे बोलवतील आणि परत जाताना गोध्रा घडवतील. जाळपोळ करतील, त्यावर आपली पोळी भाजतील. निवडणूक आल्यावर घरांच्या होळ्या पेटतील आणि त्यांच्या ते पोळ्या भाजतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचा समाचार आज गिरीश महाजन यांनी घेतला. आम्ही सर्वांनी अयोध्येत राम मंदीर व्हावे यासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, दीर्घ काळ लढा दिला आणि आज जेंव्हा राम मंदीर होत होत असतांना उध्दव ठाकरेंची ही टीका दुर्देवी आहे.

राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शेलक्या शब्दात टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर दिले आहे. सतत बालिश वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या मागे कोणी नसल्याने ते अस्वस्थ आहेत, असा चिमटाही महाजन यांनी यावेळी काढला.

गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. सतत बालिश वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत आहेत. उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली हे दुर्देवी आहे. आम्हालाही त्यांच्यावर टीका करते येईल मात्र आम्ही पातळी सोडणार नाही. तिकडे संजय राऊत ही वक्तव्य करतात मात्र ते आऊट ऑफ आहेत, त्यांच्यावर काय बोलणार, पण उध्दव ठाकरेंकडून अशी अपेक्षा नसल्याचे महाजन म्हणाले.