जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । भोसरी प्रकरणातील चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढू शकतात असे म्हटले जात आहे.
भोसरी प्रकरणाच ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालंच पाहिजे अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली आहे. यावेळी ते म्हणाले कि, झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा त्यात खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर येईल असे यावेळी महाजन म्हणाले.
भोसरी प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणात लवकर चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात सरकार हे विरोधी पक्षाचे समर्थन करीत असल्याचे हे अनोखे उदाहरण आहे, असंही न्यायालयाने म्हटल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सत्तेच्या तालावर तपास यंत्रणा नाचत आहे, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचं खडसे म्हणाले होते.