---Advertisement---
एरंडोल गुन्हे जळगाव जिल्हा सरकारी योजना

सावधान : घरकुलाचे अनुदान घेवून बांधकाम न करणार्‍यांना तुरुंगाची हवा!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : २७ फेब्रुवारी २०२३ : प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांमधील घरकुले लाभार्थ्यांना मंजूर होऊन बांधकामासाठी पहिला हप्ता देण्यात आला. त्यानंतर शंभर दिवस कालावधी उलटला आहे. मात्र घरकुलांच्या विविध योजनांचा पहिला हप्त घेऊनही बांधकाम केले नसल्याचे जळगाव जिल्ह्यात उघडकीस आले आहे. एरंडोल पंचायत समितीने याविरुध्द कडक भुमिका घेतली आहे. पहिला हप्त घेऊनही बांधकाम न करणार्‍या तालुक्यातील ४७७ जणांविरुद्ध पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांमार्फत लवकरच हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

gharkul jpg webp webp

बांधकाम सुरू करण्याबाबत पंचायत समिती व ग्रामपंचायती मार्फत तोंडी सूचना तसेच लेखी सूचना देऊनही बांधकाम अद्याप सुरू केले नाही, अशा तालुक्यातील ४७७ घरकुल लाभार्थ्यांकडून अनुदान रक्कम वसुली करून त्यांना रद्द करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. जे लाभार्थी अनुदान रक्कम परत करण्यास नकार देत आहेत, अशा लाभार्थी यांचे ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या स्वयम मालकीच्या कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेवर किंवा महसूल दप्तरी असलेल्या शेती सातबारा उतार्‍यावर किंवा लाभार्थी याच्या स्थावर जंगम मालमत्तेवर बोजा बसविण्याच्या आदेश शासनाकडून प्राप्त झालेला आहे.

---Advertisement---

अनुदानाचा गैरवापर करणार्‍या लाभार्थ्यांवर एरंडोल पोलिस स्थानकात व कासोदा पोलिस स्थानकात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत घरकुल बांधकामास सुरुवात केलेली नाही, अशा लाभार्थ्यांवर येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही करण्यात येईल, तसेच असे लाभार्थी भविष्यात घरकुलांचा लाभ मिळण्यास अपात्र राहतील. लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून देण्यात आलेली रक्कम पूर्णपणे वसूल करण्यात येणार असल्याचे एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---