---Advertisement---
आरोग्य जळगाव जिल्हा

दारुचे व्यसन १४ दिवसात सुटू शकते…वाचा सविस्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ ऑगस्ट २०२३। दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. कित्येकांचे जीव देखील जातात. दारुच्या अतिसेवनामुळे लिवर खराब होते, पोटाच्या समस्या उद्भवतात. सामाजिक, आर्थिक आणि कौटूंबिक स्वास्थ्य देखील मद्यपी व्यक्‍तींचे खराब होते. मात्र व्यसन सोडवणे म्हणजे कठीणच आहे. त्याचे शरिरावर विपरीत परिणाम होईल, अशी भिती असते तरीही दारु सुटत नाही! मात्र आता जळगावमध्ये केवळ १४ दिवसात दारुची सवय सुटू शकते. ती कशी? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

sankalp jpg webp webp

काहींना दारु सोडण्याची इच्छा असते. मात्र खरचं दारु सुटू शकते का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या शिवाय दारु सोडविण्यासाठी उपचार केल्यास त्याचे शरिरावर अन्य विपरीत परिणाम होतात का? अशी भीतीही असते. मात्र खात्रीशीर उपचाराची हमी देणारे, तज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार देणारे, विशेष म्हणजे फक्‍त १४ दिवसातच दारुची सवय सोडवून देणारे व्यसनमुक्‍ती केंद्राने जळगाव जिल्ह्यात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील एका स्वतंत्र विभागात संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्राची ओपीडी व एक स्वतंत्र सुसज्ज असा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. केवळ १४ दिवसातच दारु सुटण्याचा अनुभव शेकडो व्यसनधारी लोकांसह कुटूबियांनी घेतला आहे.

---Advertisement---

केंद्र शासन मान्यताप्राप्त संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रात दारुचे व्यसन असणार्‍या आणि मनापासून दारु सोडविण्याची इच्छा असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. या सर्व गोष्टींना कसे थांबवायचे, रुग्णाच्या मनातील भिती कशी दूर करायची यासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशन केले जाते. आणि आजवर त्याचे सकारात्मक परिणाम रुग्णावर दिसून आले असून रुग्णाच्या कुटूंबियांनी देखील संकल्प केंद्राचे आभार मानले आहे.

संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रात मानसोपचार तज्ञ डॉ.विलास चव्हाण यांच्यासह ८ मानसोपचार डॉक्टरांची टिम कार्यरत असून प्रशस्थ वॉर्डमध्ये रुग्णांना दाखल करुन घेतल्या जाते. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या वेळेत ओपीडी सुरु असून रुग्ण येथे येवून डॉक्टरांची भेट घेऊ शकतात. डॉक्टरांचा सल्‍ला येथे मोफत दिला जातो. तसेच दारु सोडविण्यासाठी ७ हजार रुपये या अल्पदरात अ‍ॅडमिटची व्यवस्था, भोजन व्यवस्था, औषधी दिली जाते. ‘नशामुक्‍त भारत अभियांनातर्गत’ सहभागी व्हा, अधिक माहितीसाठी डॉ.आदित्य ९४०४४ ७६१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---