आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे : माजी मंत्री बबनराव पाचपुते
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ३६५ दिवस कार्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले. भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगरच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर, अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप शनिवार दि.१३ रोजी झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, विभाग संघटनमंत्री रवि अनासपुरे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रशिक्षण वर्ग प्रमुख पोपट भोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, महेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, गोविंद अग्रवाल, जिल्हा परिषद सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, विद्या दिलीप पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन, आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, रेखा पाटील, व्यवस्था प्रमुख राजेंद्र घुगे पाटील आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्ग शिबिरात दुसऱ्या दिवशीच्या पाचव्या सत्रात खासदार रक्षा खडसे यांनी ‘सोशल मीडियाचा प्रसार’ या विषयावर तर सहाव्या सत्रात पत्रकार दिनेश दगडकर यांनी ‘भारताची वाढती सुरक्षा व सामर्थ्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात आमदार राजुमामा भोळे यांनी प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेऊन आगामी काळात अधिक क्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन सचिन पानपाटील यांनी केले तर आभार पोपट भोळे यांनी मानले.