श्री छत्रपती राजे संभाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात भूगोल दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२३ । येथील मंगलमूर्ती बहुउद्देशीय शिक्षण मंडळ संचलित श्री छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 14 जानेवारी 2023 रोजी भूगोल दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. माधुरी पाटील या उपस्थित होत्या.
सर्वप्रथम प्रा. डॉ. विश्वनाथ महाजन व मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीगोलाचे पूजन करण्यात आले यावेळी भूगोल विषयाचे प्रा. किशोर गुंजाळ यांनी भूगोल दिनाविषयी तसेच पर्यावरणाविषयी माहिती सांगितली पर्यावरणा च्या होणाऱ्या बदलाबद्दल व त्या बदलाचा पृथ्वीवर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली.
विद्यार्थिनी शिक्षिका साक्षी पाटील यांनी पृथ्वीचा मकर राशीतील प्रवेश चे महत्व सांगितले या कार्यक्रमास प्रथम वर्षाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका तसेच प्रा. डॉक्टर विश्वनाथ महाजन प्रा. माधुरी पाटील प्रा.किशोर गुंजाळ डॉ. जगदीश निमकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते