जळगाव जिल्हा

गायत्री ठाकूरची थायलंडच्या सौंदर्यवती स्पर्धेत निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२३ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाची विद्यार्थिनी गायत्री ठाकूरची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गायत्री ठाकूरने गतवर्षी ‘मिस हेरिटेज ऑफ इंडिया’ हा राष्ट्रीय किताब पटकावला होता. आपला अभ्यासक्रम पूर्ण करताना भारतातील वारसा स्थळे, शिल्पकला, जगप्रसिद्ध अजिंठा बुद्ध लेण्यातील चित्रकला या अनुषंगाने देशभर ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जागृतीने कार्य केले. यावर्षी थायलँड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी गायत्री भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धाही गाजवणार, असा विश्वास तिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button