---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

गावठी दारूची विक्री आणि वाहतूक कारवाईत २ लाख ४ हजार ६४० रूपये किंमतीच मुद्देमाल हस्तगत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपुर्वी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा पोलीस विभागा संयुक्त कारवाईनंतर आता गावठी दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा धडका लावला आहे. शनिवारी १९ ऑगस्ट रोजी पथकाने जळगाव तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई करत एकुण २९ गुन्हे दाखल करण्यात येवून २७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २ लाख ४ हजार ६४० रूपये किंमतीच मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

image 39 jpg webp webp

राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव जिल्हा पोलीस दल आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने १७ आणि १८ ऑगस्ट रोजी गवठी दारू बनविण्याची हातभट्टीवर छापेमारी करून लाखो रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आता पथकाने शनिवारी १९ ऑगस्ट रोजी जळगाव तालुक्यात अवैधरित्या दारू वाहतूक करणे आणि गावठी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईचा धडका लावला आहे.

---Advertisement---

पथकाने कारवाई करत एकुण २७ जणांना अटक केली आहे. याबाबत वेगवेगळे २९ गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने केलेल्या कारवाई कच्चे रसायन, तयार गावठी दारू, देशी दारू, दोन मोटारसायकली असा एकुण २ लाख ४ हजार ६४० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---