जळगाव शहर

मेसमध्ये गॅसचा भडका, तरुणांनी दाखवले प्रसंगावधान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । शहरातील मारोतीपेठ परिसरात बंगाली बांधवांची एक मेस आहे. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसचा भडका उडाला. परिसरातील तरुणांनी प्रसंगावधान दाखविल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला आहे.

मारोतीपेठ परिसरात गणेश मंडल बंगाली याचा घरगुती मेसचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅसचा भडका उडाला आणि सिलेंडरने पेट घेतला. भीतीने नागरिक पळ काढत असताना परिसरातील तरुणांनी धाव घेत फायर एक्स्ट्रूनजरने आग आटोक्यात आणली.

आगीची माहिती स्थानिक नागरिकांनी मनपा अग्निशमन दलाला कळवली असल्याने ते देखील काही क्षणात बंब घेऊन त्याठिकाणी पोहचले होते.  अग्निशमन दलाचे कर्मचारी वसंत न्हावी, भगवान पाटील, रवी बोरसे, नितीन बारी आदी यावेळी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button