⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | गुन्हे | अन् दोन ओमनी गाड्या जळून झाल्या खाक; पारोळ्यात नेमकं काय घडलं..

अन् दोन ओमनी गाड्या जळून झाल्या खाक; पारोळ्यात नेमकं काय घडलं..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२४ । ओमनी वाहनामध्ये अवैधरीत्या गॅस भरताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तर दोन चारचाकी (ओमनी) जळून खाक झाला. ही घटना पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात घडली.

याबाबत असे की, पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या म्हसवे शिवारात शुक्रवारी (ता.१९) रात्री साडेनऊला दोन ओमनींमध्ये अवैधरीत्या गॅस भरला जात होता. मात्र गाडींमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. यात दुकानात असलेले तीन ते चार सिलिंडर देखील फुटले तर गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला त्यातील मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी ओमनीला लागलेली आग आटोक्यात आणली.

आग विझल्यानंतर अग्निशमन दलाने याठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ गॅस सिलिंडर ताब्यात घेतले. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये अवैधरीत्या गॅस कोण भरत होते. ही वाहने कोणाची होती. हे मात्र समजले नाही. यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. म्हसवे शिवारात असलेला हा गॅसचा अवैध केंद्र तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.