⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | नवरात्र उत्सवात खेळायचा आहे गरबा : ‘इतक्या’ वाजेपर्यंत आहे शासनाची मुदत

नवरात्र उत्सवात खेळायचा आहे गरबा : ‘इतक्या’ वाजेपर्यंत आहे शासनाची मुदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ ।  संपूर्ण देशासह जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. यामुळे संपूर्ण नवरात्र उत्सवाच एक प्रमुख आकर्षण असलेल गरबा नृत्य देखील जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आल आहे. मात्र रात्री किती वाजेपर्यंत गरबा साजरा केला जाऊ शकतो? हे तुम्हाला माहित आहे का?

जळगाव जिल्ह्यात गरबा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यामुळे रात्री दहा वाजेपर्यंतची परवानगी या नृत्यासाठी देण्यात आली आहे. तर अष्टमीला आणि नवमीला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मोठ्या उत्साहात जळगाव जिल्ह्यामध्ये गरबा खेळण्यात येणार आहे.

याचबरोबर शासन स्तरावर नऊ दिवस गरबासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी याबाबत बैठक सत्र सुरू आहे. अशी माहिती समोर येत आहे. मात्र अजून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी अष्टमी आणि नवमीला रात्री बारा वाजेपर्यंत आणि इतर दिवस रात्री दहा वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सत्तेवर आल्या आल्या एकनाथ शिंदे सरकारने सर्वच उत्सव मोठ्या दणक्यात साजरे होतील अशी घोषणा केली होती. यामुळे गरबासाठी देखील रात्री बारा वाजेपर्यंतची वेळ मिळावी अशी मागणी भाविक करत आहेत. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाहीये. पर्यायी तो होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह